Torres Scam Three bank accounts of company frozen, investors rush to Dadar police to file complaint PPK


लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोरेस ज्वेलरी ब्रँडच्या दादर कार्यालयाची आज गुरुवारी (ता. 09 जानेवारी) झाडाझती करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास बुधवारी (ता. 08 जानेवारी) आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

मुंबई : लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोरेस ज्वेलरी ब्रँडच्या दादर कार्यालयाची आज गुरुवारी (ता. 09 जानेवारी) झाडाझडती करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास बुधवारी (ता. 08 जानेवारी) आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेने दोन पथके तयार केली असून यातील एक पथक हे गुंतवणूकदारांचे तक्रारअर्ज स्वीकारणार आहेत, दुसऱ्या पथकाकडून फसवणुकीचा तपास करण्यात येणार आहे. तर आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या टोरेस ब्रँडची तीन खाती गोठवलेली आहेत. यामध्ये कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (Torres Scam Three bank accounts of company frozen, investors rush to Dadar police to file complaint)

आर्थिक गुन्हे शाखेने टोरेसचे जी तीन बँक खाती गोठवली आहेत, त्याची संपूर्ण माहिती काढण्यात येत असून या टोळीने अशाच प्रकारे परदेशातही अनेक गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची माहिती आता समोर आली आहे. तर या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी बुधवारी दादर पोलीस ठाण्याबाहेर गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये 1500 हून अधिक गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली. पण जेव्हा बुधवारी तक्रार दाखल करून घेण्यात येत होती, तेव्हा अनेक तक्रारदार पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. तसेच, ज्या लोकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जमावे, अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण ही पोस्ट कोणी व्हायरल केली, हा सुद्धा या प्रकरणातील चौकशीचा भाग असून याबाबत आता सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

– Advertisement –

हेही वाचा… Torres Scam : डोळस असून ठेचाळणारे

या प्रकरणी पोलिसांनी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या टोरेस ब्रँडच्या जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि रशियन भारतीय नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली आहे. 52 वर्षीय तानिया पाच वर्षांपासून कुलाबा परिसरात राहायची. तर 44 वर्षाची वॅलेंटिना ही 15 वर्षांपासून डोंबिवली परिसरात राहते. दोघींचे दोन लग्न झाले आहे. जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेंको हे कंपनीचे संस्थापक आहेत. व्हीकटोरीया ही युक्रेनची नागरिक असल्याची, तर कार्टर आणि तौफिक रियाज ही एकच व्यक्ती आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.

– Advertisement –

टोरेस कंपनीने मुंबई, नवी मुंबई, कल्याण परिसरात सहा कार्यालये सुरू केली होती. या कार्यालयाच्या माध्यमातूनच त्यांनी लाखो मुंबईकरांची फसवणूक केली आहे. दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड या सहा ठिकाणी या कंपनीने आपल्या शाखा सुरू केल्या होत्या. पण अचानक सोमवारी (ता. 06 जानेवारी) या सहाही ठिकाणची कार्यालये बंद झाल्याने गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या कंपनीत गुंतवलेल्या रकमेतून 10 टक्के परतावा मिळण्याच्या लालसेने काही लोकांनी तर आपल्या आयुष्याची जमापुंजी या कंपनीला दिली. तर अनेकांनी आपले घर, सोन किंवा कर्ज घेऊन या कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.



Source link

Comments are closed.