घोडबंदरमध्ये बांधकाम साईटवरील टॉवर क्रेन कोसळली, एक जण ठार, दोघे जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मीरा रोड पूर्व भागातील घोडबंदर परिसरातील जेपी नॉर्थ गृहसंकुलाच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकाम साईटवरील टॉवर व्रेन आज सायंकाळी कोसळली. या दुर्घटनेत व्रेनचालक जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही व्रेन जे. के. आयरिश सोसायटीच्या पार्पिंगमध्ये कोसळल्याने चारचाकी गाडय़ांचेही मोठे नुकसान झाले आहे.

घोडबंदर परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याच साईटवर टॉवर व्रेन बसवण्यात आली असून 11 व्या मजल्यापर्यंत काम पूर्ण झालेले आहे. आज नेहमीप्रमाणे काम सुरू असताना सायंकाळी अचानक व्रेन कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.