भारत पाकिस्तान तणाव! अटारी-वाघा बॉर्डरवरुन व्यापार सुरु, अफगाणिस्तानातून 162 ट्रक भारतात दाखल
अटारी वागा सीमा: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत कठोर पावले उचलत अटारी-वाघा बॉर्डरुन होणारा व्यापार बंद केला होता. अद्यापही पाकिस्तानसोबत व्यापार सुरु करण्यात आलेला नाही. दरम्यान, व्यापाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. भारताने अफगाणिस्तानातून ट्रकच्या प्रवेशास मान्यता दिली आहे. भारताने पाकिस्तान सीमेवर अडकलेल्या सुमारे 162 अफगाण ट्रकना प्रवेश परवानगी दिली आहे.
या संदर्भात, शुक्रवारी (16 मे) अफगाणिस्तानातून येणारे 5 ट्रक अटारी इंटिग्रेटेड चेकपोस्टवरून भारतात दाखल झाले आणि आज म्हणजेच शनिवार दिनांक 17 मे रोजी 10 ट्रक भारतात दाखल झाले. भारतीय अधिकाऱ्यांनी सुकामेवा आणि काजू घेऊन जाणाऱ्या सुमारे 162 अफगाण ट्रकना प्रवेश दिला आहे.
अफगाणिस्तानातील ट्रकला भारतात प्रवेश करण्याची परवानगी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानसोबतचे व्यापार करार रद्द करण्यात आले आहेत. यामुळं प्रामुख्याने अफगाणिस्तान आणि इतर देशांमधून येणाऱ्या वस्तूंना अमृतसरच्या अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानातून भारतात प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर अटारी-वाघा सीमेवरून होणारा व्यापार थांबला होता, परंतु शुक्रवारी पुन्हा एकदा भारत सरकारने अफगाण ट्रकना प्रवेश दिला.
अफगाणिस्तानातून येणारी 162 वाहने पाकिस्तानात अडकली आहेत, ज्यांना भारताने प्रवेश दिला आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढतो किंवा युद्धासारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा हजारो लोकांच्या रोजगारावर परिणाम होतो. गेल्या काही वर्षांत भारतातील अटारी सीमेवर व्यापारात मोठी घट झाली आहे. परंतू, तरीही काही प्रमाणात व्यापार होत होता. परंतु दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याने अटारी-वाघा सीमेवर होणारा रिट्रीट सेरेमनी देखील थांबला आहे, ज्यामुळे संपूर्ण अमृतसरच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे.
हॉटेल व्यावसायिकांवर मोठा परिणाम
अमृतसरमध्ये सरासरी 5000 ते 6000 हॉटेल्स आहेत, जी अटारी वाघा बॉर्डरवर होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीवर अवलंबून आहेत. कारण दररोज हजारो पर्यटक रिट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी येतात. पण, ते बंद झाल्यापासून, त्यांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की अटारी सीमेवर फोटो, कॅलेंडर, लॉकेट इत्यादी विकणाऱ्या लोकांचे जीवनमानही या रिट्रीट सेरेमनीवर अवलंबून आहे, त्यांनाही आज त्यांच्या घरात अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासोबतच याचा ट्रक युनियनवरही मोठा परिणाम होतो, कारण जेव्हा इतर देशांशी व्यापार नसतो, देवाणघेवाण होत नाही, तेव्हा ट्रक वापरले जात नाहीत. याचा परिणाम त्यांच्या रोजगारावरही होतो.
महत्वाच्या बातम्या:
भारताकडून अमेरिकेला जीरो टॅरिफ ट्रेड करार संदर्भात ऑफर, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा, म्हणाले की..
अधिक पाहा..
Comments are closed.