उल्हासनगर, विठ्ठलवाडीत स्कूल व्हॅनची झाडाझडती; वाहतूक पोलीस इन अ‍ॅक्शन, 16 चालकांवर कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्कूल व्हॅन आणि स्कूल बसेस चालक अनेकदा नियम धाब्यावर बसवून गाड्या चालवत असल्याच्या तक्रारीत वाढ झाल्यानंतर उल्हासनगर वाहतूक पोलीस इन अॅक्शन मोडवर आले आहेत. उल्हासनगर, विठ्ठलवाडी विभागात स्कूल बसेस थांबवून अचानक तपासणी केली जात असून या वाहनांमधील विद्यार्थी सुरक्षित आहेत का याची खातरजमा केली जात आहे. नियम मोडणाऱ्या १६ चालकांवर कारवाई करण्यात आल्याने स्कूल बसचालकांचे धाबे दणाणले आहेत.

बदलापूर आणि विठ्ठलवाडी वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्कूल बस तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ आणि विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. यात स्कूल बस, स्कूल व्हॅन, ओमनी, इको, रिक्षाचालकांनी मद्यपान केले आहे का, हे ब्रेथ अॅनलायझरच्या माध्यमातून चेक करण्यात येत आहे. त्यांचे लायसन्स, वाहनाचे फिटनेस योग्य आहे का, त्यांनी सीट बेल्ट लावला आहे का, विद्यार्थ्यांना कोंबून व्हॅनमध्ये भरले आहे का याची कसून तपासणी सुरू आहे. यात सीट बेल्ट, लायसन्स आणि ओव्हरसीटप्रकरणी १६ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वाहूतक विभागाची संतोष भोईर, संजय बेंद्रे, जितेंद्र चित्ते, मनोज काळे, नाना आव्हाड, भारत खांडेकर, रणजित खोत ही टीम फिल्डवर उतरली आहे.

Comments are closed.