दोन विमाने हवेत धडकली, चौघे ठार
फिलिपिन्समध्ये प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाची दोन विमाने धडकली. या अपघातात चार वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. फर्नांडो एअर बेसवर हे प्रशिक्षण सुरू होते. या दुर्घटनेनंतर फिलिपिन्सच्या हवाई दलाने एसएफ-260 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम असेल. दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Comments are closed.