केरळमध्ये भीषण अपघात, ट्रकला कारची धडक, 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू
केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एका भीषण रस्ता अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावर कैपमंगलम जवळ पनाम्बिकुनू येथे झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील आठही जण जागीच ठार झाले.
पोलिसांनी शनिवारी या अपघाताची माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, मृत हे शेजारील तामिळनाडू राज्यातील विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11.40 च्या सुमारास हा अपघात झाला. तरूणाची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीवर आदळल्याचे सांगण्यात आले. या धडकेने कारचे मोठे नुकसान झाले असून त्यातील आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव मोहिमेद्वारे कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, सर्व मृतदेह त्रिशूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारची नोंद तामिळनाडूमध्ये करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे, अपघातात जीव गमावलेले सर्व लोक तामिळनाडूचे रहिवासी आणि विद्यार्थी असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार गुरुवायूरहून कोडुंगल्लूरकडे जात होती. दरम्यान, कपमंगलमजवळील पनाम्बिकुनू येथे राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीवर त्यांची धडक झाली. अपघाताच्या कारणाबाबत सविस्तर माहिती पोलिसांकडून समोर आलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Comments are closed.