Train Accident Maharashtra Jalgaon incident dcm ajit pawar explained tragedy in marathi
जळगाव : जळगावातील पाचोरा येथे काही प्रवाशांना बंगळूरू एक्स्प्रेसने उडवल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (22 जानेवारी) घडली. या घटनेमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आली असून संपूर्ण राज्य हादरले. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आणि गुरुवारी (23 जानेवारी) प्रसारमाध्यमांसमोर काय घडले ते सर्व सांगितले. अफवा पसरवल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, यावेळी त्यांनी अनेक बाबींचा खुलासा केला. तसेच, यावेळी सैफ अली खान हल्लाप्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. (Train Accident Maharashtra Jalgaon incident dcm ajit pawar explained tragedy)
हेही वाचा : Jalgaon Train Accident : रेल्वे अपघाताची अमित शहांकडून दखल, मुख्यमंत्र्यांसोबत केली चर्चा
“आपल्या अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर असे लक्षात आले की, 30 वर्षीय उदलकुमार हा उत्तर प्रदेशमधील भिंगा गावाचे रहिवासी आहे. तो रोजगारासाठी लखनऊ येथून मुंबईसाठी निघाले होते. त्याच्यासोबत त्याचा मेहुणा विजय कुमारदेखील होता. हे दोघेही सर्वसाधारण तिकीट घेऊन सर्वसाधारण बोगीमध्ये वरच्या आसनावर बसलेले होते. त्यावेळी काही चहा विक्रेते यांनी आग लागली अशी ओरड केली. ही आरोळी ऐकल्यानंतर संपूर्ण बोगीत तसेच आजूबाजूच्या बोगींमध्येही गोंधळ उडाला. त्यावेळेस स्वतः जीव वाचवण्यासाठी घाबरून गाडीच्या दोन्ही बाजूने उड्या मारल्या.” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
तसेच अजित पवार पुढे म्हणाले की, “गाडीचा वेग असल्यामुळे इतर प्रवासी खाली उतरू शकत नव्हते. तेव्हा कोणीतरी स्वतः डोकं चालवले आणि साखळी ओढली. त्यानंतर जिथून जागा मिळेल तिथून प्रवासी खाली उतरू लागले. यावेळी ते उतरून दुसऱ्या रुळावर आले, तेव्हा त्यावरून जाणाऱ्या बंगळूरू नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस जलद वेगाने जात असताना रुळावरील प्रवाशांना चिरडले. त्यानंतर ती गाडी पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला.” अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
अजित पवार पुढे म्हणाले की, “घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेत प्रवाशांचे शरीराची दुर्दशा झाली आहे. यावेळी उदलकुमार आणि विजयकुमार यांना देखील धडक बसलेली असून त्यांनी 6 ते 7 प्रवासी मयत झालेले स्वतः पाहिले. अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे,” असे त्यांनी सागितले. तसेच, “आतापर्यंत 10 जणांचा मृतदेह सापडलेले असून तीन मृतदेहांच्या शरीराचे तुकडे झाल्यामुळे अद्याप ओळख पटलेली नाही. यामध्ये एक पुरुष आणी दोन महिला असून पुर्ण मृतदेह सापडलेल्या दहापैकी आठ पुरुष आणि दोन महिला आहेत. ही घटना निव्वळ अफवांमुळे घडलेली आहे.” असे त्यांनी सांगितले.
Comments are closed.