Transfer of 12 more IAS officers in the state msj


(IAS Transfer) मुंबई : राज्यात आज, मंगळवारी 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या नव्या आदेशानुसार महाजेनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनबाल्गन पी. यांची उद्योग, ऊर्जा आणि कामगार सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सध्या या पदी असलेल्या डॉ. हर्षदीप कांबळे यांची बेस्टचे महाव्यवस्थापक (GM) म्हणून बदली करण्यात आली आहे. (Transfer of 12 more IAS officers in the state)

याशिवाय, नाशिक महापालिका आयुक्तपदी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, आतापर्यंत ते वर्ध्याचे जिल्हाधिकारी होते. या सर्व बदल्यांमुळे गेल्या अवघ्या चार दिवसांत तब्बल 35 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

– Advertisement –

हेही वाचा – Pratap Sarnaik : मुंबईच्या वाहतूक कोंडीला केबल टॅक्सीचा पर्याय; सरनाईकांनी स्वीकारला परिवहन खात्याचा पदभार

बदली करण्यात आलेले अन्य सनदी अधिकारी –

– Advertisement –

  • अनिल डिग्गीकर, महाव्यवस्थापक, बेस्ट यांची अतिरिक्त मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती
  • डॉ. राधाकृष्णन बी., मुख्यमंत्र्यांचे सहसचिव, मुंबई यांची महाजेनको, मुंबईचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
  • संजय दैने, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची, वस्त्रोद्योग, नागपूर आयुक्तपदी नियुक्ती
  • श्रीमती वनमती सी., सहआयुक्त, राज्य कर यांची जिल्हाधिकारी, वर्धा म्हणून नियुक्ती
  • संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई या पदावर नियुक्ती
  • अविश्यंत पांडा, आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांची जिल्हाधिकारी, गडचिरोली म्हणून नियुक्ती
  • विवेक जॉन्सन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर या पदावर नियुक्ती
  • अण्णासाहेब दादू चव्हाण (SCS पदोन्नती) उपायुक्त (महसूल) पुणे विभाग यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
  • गोपीचंद कदम (SCS पदोन्नती) यांची स्मार्ट सिटी, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

हेही वाचा – Sanjay Shirsat : पदभार स्वीकारण्यापूर्वीच मंत्री शिरसाटांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर; वसतीगृहातील दुरवस्थेने संताप अनावर


 

Edited by Manoj S. Joshi



Source link

Comments are closed.