IND Vs AUS T20 Series – टीम इंडियाची डोकेदुखी कमी झाली! चौथ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा हादरा

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. आतापर्यंत तीन सामने झाले असून पहिला पावसामुळे रद्द झाला, दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि तिसरा सामन्यात टीम इंडियाने आपल्या नावावर केला. त्यामुळे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी चौथा टी-20 सामना मालिकेच विजयी आघाडी घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला तगडा झटका लागला आहे.

रविवारी (02 नोव्हेंबर 2025) झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेटने पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाने या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता चौथ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसून सुरूवात केली आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणारा ट्रेव्हिस हेड टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियासाठी इंग्लंडविरुद्ध होणारी अॅशेस मालिका खूप महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची असते. यामुळे आगामी अॅशेस मालिकेला नजरेसमोर ठेवत ट्रेव्हिस हेडला पुढील दोन टी-20 सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. ट्रेव्हिस हेड आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा शेफील्ड शील्डमद्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून मैदानात उतरणार आहे. या महिन्याच्या अखेरील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये अॅशेल मालिकेला सुरूवात होणार आहे. 21 नोव्हेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

Comments are closed.