AUS vs ENG: ट्रॅव्हिस हेडचं तुफानी शतक व्यर्थ! लक्षवेधी कामगिरी करत ‘या’ खेळाडूने पटकावला सन्मान
ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात गोलंदाजांनी जबरदस्त माऱ्याने वर्चस्व गाजवलं. इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलियासमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सुरुवातीला हे लक्ष्य कंगारूंसाठी अवघड होईल असं वाटत होतं. मात्र ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) तुफानी फलंदाजी करत फक्त 69 चेंडूत शतक झळकावलं. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळेच ऑस्ट्रेलियानं ऍशेस 2025-26 च्या पहिल्या कसोटीमध्ये सहज विजय मिळवला. तरीदेखील ट्रॅव्हिस हेडला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला नाही.
पर्थमध्ये झालेल्या ऍशेस कसोटीमध्ये दोन्ही बाजूंनी गोलंदाजांनी धमाका केला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात इंग्लंडला 172 वर रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया स्वतः फक्त 132 धावांवर बाद झाली. इंग्लंडकडे थोडीशी आघाडी होती, पण त्यांच्या दुसऱ्या डावातही ते फक्त 164 धावाच करू शकले.
अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या समोर 205 धावांचे लक्ष्य होते, आणि इंग्लंडचा गोलंदाजी हल्ला पाहता हे लक्ष्य कठीण वाटत होतं. पण हेडने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला.
त्याने इंग्लिश गोलंदाजांना अक्षरशः हुकवून ठेवत 69 चेंडूत शतक पूर्ण केले. शतकानंतरही तो थांबला नाही. मोठमोठे फटके मारत 83 चेंडूत 123 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या डावात 4 षटकार आणि 16 चौकार होते.
ऑस्ट्रेलियाने केवळ 28.2 षटकांत लक्ष्य गाठलं. ज्या पिचवर बाकीचे फलंदाज झगडत होते, तिथे हेडने गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्यामुळे पहिला सामना संपल्यानंतर तो प्लेयर ऑफ द मॅच ठरेल असंच वाटत होतं, पण तसं झालं नाही.
ट्रॅव्हिस हेडसोबत मिचेल स्टार्कचं (Mitchell Starc) प्रदर्शनही अप्रतिम होतं. त्याने संपूर्ण सामन्यात तब्बल 10 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 3. या भेदक कामगिरीमुळे प्लेयर ऑफ द मॅचचा मान स्टार्कलाच मिळाला, आणि चाहत्यांकडूनही त्याला भरभरून दाद मिळाली.
सामन्यानंतर स्टार्क म्हणाला, मी 15 वर्षांपासून असंच खेळतो आहे. मी नेहमी जसं करत आलो, तेच करत राहिलो तर मला खूप आनंद होतो. मी नशीबवान आहे आणि संघाला विजय मिळवून दिल्याचा अभिमान आहे. आता आम्ही हा विजय सेलिब्रेट करू.
Comments are closed.