हैदराबाद एक मोठा झोटका आहे ..! स्पोको पोलस्टे

भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमा तणावामुळे आयपीएल 2025चा हंगामा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. पण त्यानंतर आता उर्वरित हंगाम कालपासून (17 मे) सुरू झाला आहे. यादरम्यान पहिल्याच सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. पण पावसाने हा सामना वाहून नेला. तत्पूर्वी आयपीएल 2025 दरम्यान सनरायझर्स हैदराबादला (SRH) मोठा धक्का बसला आहे.

एसआरएच संघाचा स्टार सलामीवीर ट्रॅव्हिस हेडची (Travis Head) कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी माहिती दिली आहे की, ट्रॅव्हिस हेडची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे हेड अद्याप भारतात परतू शकलेला नाही.

सनरायझर्स हैदराबादचा पुढचा सामना (19 मे) रोजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत व्हेटोरी म्हणाले की, ट्रॅव्हिस उद्या सकाळी येत आहे. त्याला येण्यास उशीर झाला होता. प्रत्यक्षात त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो प्रवास करू शकला नाही. त्यामुळे तो उद्या सकाळी येईल आणि त्यानंतर आम्ही त्याची प्रकृती काय आहे याचे मूल्यांकन करू.

Comments are closed.