ट्रेंड – तरुणाची हतबलता
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अनेक युजर्सच्या थेट मनाला भिडला आहे. हा व्हिडीओ बांगलादेशातील आहे. या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, एक तरुण कामाला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत आहे. ट्रेनमध्ये उभे राहायलाही जागा नसल्याने हा तरुण ट्रेनच्या दरवाजावर उभा आहे. तितक्यात पाऊस आला. हा तरुण भरपावसात भिजला असून थंडीने कुडकुडत आहे, परंतु कामावर जायचे असल्याने तो सर्व सहन करतोय. कामाचे ओझे अंगावर पडले की, माणूस हतबल होतो. त्याला काम करावेच लागते, अशा कमेंट हा व्हिडीओ पाहून नेटकरी करत आहेत. हा व्हिडीओ म्हणजे केवळ व्हायरल व्हिडीओ नाही तर सर्वसामान्य लोकांचे आयुष्य दाखवणारा व्हिडीओ आहे, अशाही कमेंट युजर्सकडून केल्या जात आहेत. या व्हिडीओला हजारो ह्यूज आणि कमेंट मिळाल्या आहेत.
Comments are closed.