Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, वांद्रे पूर्व भागातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर विश्वास टाकण्यात आला असून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, विधानपरिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक होते. मात्र सिद्दीकी यांनी उमेदवारी मिळाली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पक्षाने उमेदवारी नाकारताना विश्वासात घेण्याचा साधं सौजन्यही दाखवलं नसल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली. भविष्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या लढ्यात जो साथ देईल त्याच्यासोबत असेल असं म्हणत अमोल मिटकरींनी मोठे राजकीय संकेत दिले आहेत.अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना संधी देण्यात आली आहे. आपल्याला उमेदवारी नाकारताना पक्षाने साधं विचारण्याचंही सौजन्य दाखवलं नसल्याची खंत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात प्रश्न विचारल्याने हे फळ मिळालं त्याचा प्रश्न त्यांनी केला आहे. दरम्यान उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदाराने फोन केला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात अजित पवारांचे अपघाती मृत्यू संदर्भात जे सोबत असतील त्यांच्यासोबत जाऊ, असं म्हणून त्यांनी मोठे राजकीय संकेत दिले आहेत.
Comments are closed.