Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो.. आम्हाला कार्यकर्त्यांनी महादेवाच्या मंदिरात नेलं त्या ठिकाणी ते भोंदू बाबा होते, त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला, ते माझ्यापेक्षा मोठे असल्याने संस्कृती प्रमाणे मी त्यांच्या पाया पडलो…आम्हाला माहित असते की हा महाराज कामाचा नाही पण समाज मन जपण्यासाठी आम्ही जातो, मात्र आम्ही त्याचा निषेध करतो…त्या भोंदू महाराजांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा गेले, एकनाथ शिंदे, विखे पाटील ते सुद्धा तिथे गेले पण त्यांना विचारलं का?…कोणत्या सीड्या बाहेर काढायच्या हे बीजेपी ने ठरवलं आहे, इतर लोक गेले पण त्यांना विचारलं नाही.. बच्चू कडू गरीब आहे म्हणून तुम्ही विचारत आहे, बच्चू कडूंना बदनाम करण्याचा अजेंडा बीजेपी कार्यालयाकडून आला आहे..त्या भोंदू बाबांनी जे सांगितलं त्यांचं पूर्ण निदान चुकीचं निघालं.. मी त्यावेळेस उद्धव ठाकरें यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो…खरात सोबतची माझी भेट एक्सीडेंटली झाली, कार्यकर्त्यांसोबत मी गेलो, त्या ठिकाणी माझा सत्कार झाला.. ती माझी चूक नाही, पण ते व्हिडिओ काढून मला बदनाम करण्याचं काम भाजपची टीम करत आहे…आसाराम बापूच्या भेटीला नरेंद्र मोदी सुद्धा गेले, भाजपचे मोठे चार नेते आसाराम बापू सोबत नाचताना सुद्धा आहे, मग त्यांचा राजीनामा घ्यावा लागणार नाही का? ते झाकून ठेवायचं आणि इतर लोकांचा राजीनामा घ्यायचा, कोणासोबत कोणाचा फोटो असला म्हणजे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकणं चुकीचा आहे.
Comments are closed.