Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
नाशिकचा भोंदूबाबा प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांचे फोटो अशोक खरात सोबत व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. अशातच दीपक केसरकर यांचा देखील अशोक खरातसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसरकरांकडून काही चुकीचे घडले असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील असं सूचक वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं आहे. अशोक खरात प्रकरणात आता रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर, दीपक केसरकर यांच्या राजीनामाची मागणी होत आहे. संजय राऊत यांनीही केसरकर यांचा राजीनामा मागितला आहे. यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी केसरकर यांच्याकडून काही चुका घडल्या असतीलल तर याबाबतचे धोरण एकनाथ शिंदे ठरवतील, असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळं चाकणकरानंतर अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकर यांचाही राजीनामा घेतला जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.
Comments are closed.