Devendra Fadnavis and Sunetra Pawar: मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्या नेत्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रा पवार केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर…. देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis and Sunetra Pawar: मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्या नेत्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रा पवार केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर…. देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

अजितदादांनी बारामतीकरांसाठी पाहिलेली सर्व स्वप्नं पूर्ण करण्याची क्षमता सुनेत्रा पवार यांच्यामध्ये आहे. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला आणखी एक सक्षम नेतृत्व लाभलं आहे, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सांगता सभेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या ठायी दीर्घ पल्ल्याचे राजकारण करण्याची क्षमता असल्याचे बोलून दाखवले.मी तुम्हाला दाव्याने सांगतो की, गेल्या दोन-अडीच महिन्यांमध्ये मी सुनेत्रा वहिनींचं काम बघितले आहे. मला राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून 35 वर्षे झाली आहेत. त्यामुळे एखाद्या नेत्याची क्षमता काय आहे, हे ओळखण्याची माझीही क्षमता तयार झाली आहे. त्यावरुन मी तुम्हाला सांगतो की, अजितदादांची स्वप्नं पूर्ण करण्याची सर्व क्षमता वहिनींमध्ये आहे. वहिनींच्या रुपाने महाराष्ट्राला केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नव्हे तर एक सक्षम नेतृत्व लाभले आहे. हे सांगताना माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Comments are closed.