सुषमा अंधारे ऑन शितल म्हात्रे : अशोक खरटवारूण सुषमा अंधारे आणि शितल म्हात्रे

सुषमा अंधारे ऑन शितल म्हात्रे : अशोक खरटवारूण सुषमा अंधारे आणि शितल म्हात्रे

विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषद सभागृहात उद्धव ठाकरेंसह 9 आमदारांचा निरोप समारंभ झाला. त्यावेळी, उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती. त्यावरुन शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. तर, अशोक खरात  प्रकरणावरूनही तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या सरकारला धारेवर धरलं जात आहेत. त्यातच, शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी ट्विट करत थेट नाव ठाकरे कुटुंबीयांना लक्ष्य केलं. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी शितल म्हात्रेंवर पलटवार केला. त्यावरुन, दोन्ही महिला नेत्यांमध्ये ट्विटरवरुन छन्नाछन्नी रंगल्याचं दिसून येत आहे. सुषमा अंधारे  यांनी तुमचा ओरिजनल व्हिडिओ सापडला का हो? असा सवाल शितल म्हात्रेंना केलाय.  शितल म्हात्रेंनी अशोक खरात प्रकरणावरुन ‘ताज का राज’, ताज हॉटेलमध्ये बैठक कोणाची झाली असा सवाल करत ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असं ट्विट शीतल म्हात्रेंनी केलं. त्यावर, सुषमा अंधारेंनी पलटवार केला. अहो विषय भरकटवू नका. आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत. बाय द वे तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असं तुम्ही म्हणाला होतात. तोच तो सुर्वे प्रकरणातला, त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? असा सवाल सुषमा अंधारे यांनी शितल म्हात्रेंना उद्देशून केला. त्यावर, म्हात्रेंनीही रिप्लाय दिलाय.

Comments are closed.