Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला

Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या देशासह राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशोक खरात हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना अशोक खरात याच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद आहे. मात्र, आता या पदावरुनही रुपाली चाकणकर यांची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता आहे. अशातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत निम्म्याहून जास्त आमदारांसह नेत्यांकडून पक्षाची बदनामी रोखायची असेल तर चाकणकर यांचा राजीनामा घेणेच योग्य राहील, अशी अजित पवार गटाच्या आमदारांनी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Comments are closed.