North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

आखाताचे ढग सध्या युद्धानं काळवंडून गेलेत…युद्ध पश्चिम आशियात सुरू असलं तरी सगळं जग वेठीला धरलं गेलंय…त्यामानानं पूर्व आशिया आतापर्यंत शांत होतं…पण आता या शांततेला उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी धक्का देण्याचा प्रयत्न केलाय…उत्तर कोरियाच्या एका कृतीमुळे जपान आणि दक्षिण कोरिया हादरून गेलेत…पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट…इकीकडे पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल आणि इराणमधलं युद्ध दिवसेंदिवस तापत चाललंय…आणि त्याच्या झळा सगळ्या जगाला बसायला लागल्यात…या युद्धाच्या रणधुमाळीत उत्तर कोरियाचे विक्षिप्त हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला…क्षेपणास्त्रं असूनही आपल्याला युद्धासाठी कुणी बोलवत नाही, किम जोंग उन यांची तडफड होतेय, अशा व्हायरल मिम्सनी नेटकऱ्यांचं मनोरंजन केलं…पण आता ही मिम्स गरम डोक्याच्या किम जोंग उन यांनी खरोखरच सिरियसली घेतलीयत की काय, असा प्रश्न पडावा…कारण आता शांत भासल्या जाणाऱ्या पूर्व आशियातही संघर्षाची ठिणगी पडलीय…आणि त्याचे कारण ठरलेत तापट स्वभापाचे किम जोंग उन…उत्तर कोरियानं पूर्वेकडच्या समुद्रात जवळपास १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं डागलीयत…जपानच्या सागरी हद्दीत ही क्षेपणास्त्रं पडल्यानं जपानचं टेन्शन वाढवलंय…त्यामुळे जपानमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय…उत्तर कोरियानं जे धाडस दाखवलंय, त्याचं टायमिंगही महत्त्वाचं आहे…अमेरिका पश्चिम आशियात इराणविरोधातल्या युद्धात अडकलीय…तिथल्या युद्धासाठी अमेरिकेनं क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा असलेल्या थाड बॅटरीला दक्षिण कोरियातून काही दिवसांपूर्वी हलवलंय…त्याचवेळी किम जोंग उन यांनी ही आगळीक केल्यानं दक्षिण कोरियाचेही धाबे दणाणलेत…

Comments are closed.