Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले…
Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले…
कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या अत्यंत रंजक अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणाचा पट बदलून टाकणाऱ्या घडामोडी सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला सोबत घेऊन शिंदे सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपला महापौर बसवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कालपासून मनसे (MNS) आणि शिंदे सेनेच्या (Shinde Camp) नेत्यांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. या दोन्ही पक्षांच्या युतीवर अद्याप शिक्कामोर्तब झाले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरे गटाला बाजूला ठेवून शिंदे सेना-मनसे युतीकडून सत्तास्थापना केली जाणार आहे. हा भाजप आणि ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Comments are closed.