Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून ‘तो’ माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून ‘तो’ माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांच्या अकाली निधनामुळे आम्हाला दुःख आहे, त्यामुळे पवार कुटुंबप्रमुख म्हणून बारामतीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं. काँग्रेसने बारामतीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे असंही शरद पवार म्हणाले. तसेच काँग्रेस पक्षावर वक्तव्य करण्याइतपत परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही असंही शरद पवार म्हणाले.अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला. शरद पवारांच्या पक्षाकडून बारामतीमध्ये उमेदवार देण्यात आला नाही. परंतु महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र त्यांच्या उमेदवार उभा केला आहे. या सगळ्यांवर शरद पवारांनी त्यांची प्रतिक्रिया दिली.शरद पवार म्हणाले की, “कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर समोर कुणीतरी असेल हे मान्य करुनच लढवावी लागते. आम्ही उमेदवार उभा केला नाही. अनेक लोक अनेक निवडणुका लढवतात. अजित पवार अकाली गेले त्याचं दुःख म्हणून कुटुंब म्हणून आम्हाला आहे. पवारांमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्याला लढवायची नाही असं आम्ही ठरवलं. या निवडणुकीत आम्ही उमेदवार उभा केला नाही.”
Comments are closed.