Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका

Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका

शशिकांत शिंदे यांच्या अदृश्य शक्तीच्या कारवाया धमक्या व षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजित दादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते याला माझा आक्षेप असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. विलिनीकरण संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोअर ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते, असे तटकरे म्हणाले. दादांच्या दुर्दैवी निधनानंतर त्या बैठकीमध्ये काय बोलले असं वक्तव्य करणं हा एक प्रकारचा दादांवर सुद्धा अन्याय होईल. कुठल्या विषयावर काय बोलावं, केव्हा बोलावं याच भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Comments are closed.