Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देऊ, पण…. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या डीलचा प्रस्ताव?
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देऊ, पण…. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या डीलचा प्रस्ताव?
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन देण्यासाठी विधानपरिषदेतील एका जागेवर काँग्रेस दावा करणार असल्याची चर्चा आहे. राज्यसभेसाठी शरद पवार यांना समर्थन देता येईल परंतु मविआ म्हणून विधान परिषदेत देखील एक जागा सोडण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी दिल्लीत मविआ एकत्र चर्चा करत निर्णय घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येत राज्यसभेसाठी निर्णय घेण्यापूर्वी सर्व पक्षांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. एकीकडे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी बाबतीत मविआत संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेकरता पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेसची वेट अँड वॅाचची भुमिका असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार यांच्या पक्षासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास काँग्रेस वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे.
Comments are closed.