सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली; सोळावं वरीस धोक्याचं…शुक्रवारी रंगणार अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त ‘सोळावं वरीस धोक्याचं’ हा अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव रंगणार आहे. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटयगृहात शुक्रवार 13 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता हा सांगीतिक सोहळा होणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा स्वरोत्सव होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या निमित्ताने लावणी परंपरेचा सुवर्ण ठेवा जपणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या कलास्मृतींना अभिवादन केले जाणार आहे.

सुप्रसिद्ध गायिका संपदा माने आणि संज्योती जगताप यांच्या सुरेल आवाजात लावण्या सादर करणार आहेत. निवेदन परेश दाभोळकर यांचे असून संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी सांगितले.

Comments are closed.