त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा, भारतीय पुरातत्व खात्याचं पोलिसांना
ट्रिमबाकेश्वर मंदिर: गुढी पाडव्यापासून (Gudi Padwa) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) विश्वस्त मंडळाकडून भाविकांना बुंदीच्या लाडूच्या प्रसादाचे वाटप सुरु करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याकडून त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
तिरुपती बालाजी, पंढरपूर, शिर्डी संस्थानप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील गुढी पाडव्यापासून भाविकांना प्रसादाचे बुंदीचे लाडू मिळत आहेत. मंदिराच्या आवारात परवानगी न घेता विश्वस्त मंडळाकडून प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याप्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या लाडू विक्री विरोधात माजी विश्वस्तांनी देखील भारतीय पुरातत्व खात्याकडे तक्रार दाखल केली होती.
त्र्यंबकेश्वर पोलीस काय कारवाई करणार?
मंदिराच्या आवारात प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्या प्रकरणी पुरातत्त्व खात्याकडून पोलिसांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे संरक्षित स्मारक असतानाही, तेथे अनधिकृतपणे व्यावसायिक लाडू विक्री सुरू केल्याचा गंभीर आरोप विश्वस्त मंडळावर करण्यात आला आहे. तर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा, असे भारतीय पुरातत्व खात्याने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आता या प्रकरणावर त्र्यंबकेश्वर पोलीस नेमकी काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा ‘अ’ वर्ग दर्जा
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. यावेळी, येथील तिर्थक्षेत्राची पाहणी करुन त्यांनी प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या होत्या. यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिराला अ वर्ग दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे, भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्र्यंबकेश्वर येथे वर्षाला कोट्यवधी भाविक येत असतात. म्हणूनच पंढरपूरप्रमाणे नाशिक आणि त्र्यंबकला देखील शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीत अ वर्ग दर्जा मिळाल्यास भाविकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देता येतील, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर कुंभमेळ्यापूर्वी शासनाने हा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा देण्यास नगर विकास खात्याने मंजुरी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.