तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा 'यू-टर्न'

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील रेजीनगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवणूक होत असून तेथील तृणमूल काँग्रेसच्या उमदेवाराने आपली भूमिका पुन्हा बदलली आहे. शनिवारी सकाळी या उमेदवाराने आपण उमेवारी अर्ज मागे घेत आहोत, अशी घोषणा केली होती. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसणार, अशी चर्चा होती. कारण नंदीग्राम मतदारसंघातूनही तृणमूल काँग्रेसच्या नेत्या संचिता प्रधान डे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. तथापि, रेजीनगर मतदारसंघतील उमेदवार रबिऊल आलम चौधरी यांनी आता आपली घोषणा मागे घेतली असून आपण निवडणूक तृणमूल काँग्रेसचेच उमेदवार म्हणून लढणार आहोत, अशी नवी घोषणा केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवी नावे आणि नवी चिन्हे दिली आहेत. या नव्या चिन्हाचा आपण प्रसार करणार आहोत, अशीही घोषणा रबीऊल आलम चौधरी यांनी शनिवारी केली.

Comments are closed.