बिग बॉस मराठीच्या घरात त्रिपल धमाका! तीन वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे जुन्या खेळाडूंचे धाबे दणाणले; आता खेळात येणार रंगत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीच्या घरात सध्या एकामागून एक धक्के पाहायला मिळत आहेत. रोशन भजनकरच्या एक्झिटनंतर आता खेळात जबरदस्त ट्विस्ट येणार असून, प्रेक्षकांना आणि घरातील सदस्यांना या सीझनचा सर्वात मोठा धक्का बसणार आहे. घरात आता तब्बल तीन वाईल्ड कार्ड एन्ट्रीज होणार असून संकेत पाठक, संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे हे तीन नवे चेहरे स्पर्धेत उतरणार आहेत.

हिंदी मालिकांमध्ये झळकलेली देखणी मराठी मुलगी रेवा कौरासे आता आपली छाप पाडण्यासाठी आणि खेळ जिंकायला येत आहे, तर मालिकाविश्वातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला लाडका संकेत पाठक ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक रिअॅलिटी शोज गाजवलेली संस्कृती साळुंके देखील विजयाच्या निर्धारानेच घरात प्रवेश करणार आहे. या तिघांच्या एन्ट्रीने घरातील जुनी समीकरणं आता पूर्णपणे बदलणार असून, गँगअप करणाऱ्या सदस्यांना हे नवे स्पर्धक कशाप्रकारे तोंड देतील, हे पाहणं रंजक ठरेल.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुख यांनी सदस्यांची चांगलीच कानउघाडणी केली. काही सदस्यांच्या खेळाचं त्यांनी कौतुक केलं, तर रुचितासमोर त्यांनी आपलं परखड मत मांडून तिला आरसा दाखवला. गँगअप करून खेळणाऱ्यांना त्यांनी कडक शब्दांत ताकीद दिली आहे. दुसरीकडे, सिंगल खेळणाऱ्या राखीसाठी बिग बॉसकडून खास सरप्राईज मिळालं आहे. प्राजक्ताने तन्वीबद्दल मांडलेल्या मतावरही रितेश भाऊंनी चोख उत्तर देत तन्वीला मोलाचा सल्ला दिला. या आठवड्यात नवीन सदस्यांच्या आगमनानंतर आता घराचा कॅप्टन कोण होणार आणि नॉमिनेशनमध्ये कोणाचा पत्ता कट होणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Comments are closed.