IND vs SA सामन्यात ट्रिस्टन स्टब्स आणि चाहत्यांमध्ये राडा? धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सामन्यानंतर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) याचा आहे. या व्हिडिओमध्ये स्टब्स स्टेडियममधील प्रेक्षकांवर रागावताना दिसत आहे.

ट्रिस्टन स्टब्स आणि चाहत्यांमधील ही बाचाबाची भारतीय फलंदाज शिवम दुबे (Shivam Dube) फलंदाजी करत असताना झाली. शिवम दुबेने आपल्या नेहमीच्या शैलीत एक उत्तुंग षटकार (सिक्स) मारला आणि चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. सामना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रेक्षकांनी चेंडू परत करणे गरजेचे होते. स्टब्स मैदानावरून चेंडूची मागणी करत होता, पण चाहते चेंडू परत देत नव्हते. यामुळे स्टब्सचा पारा चढला आणि तो प्रेक्षकांवर चिडलेला दिसला. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विवादाव्यतिरिक्त स्टब्सने या सामन्यात अप्रतिम खेळ केला. त्याने अवघ्या 24 चेंडूत 44 धावांची वादळी खेळी केली 183.33 चा यात 1 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याने फिल्डिंगमध्येही आपली ताकद दाखवली. केशव महाराजच्या (Keshav Maharaj) एकाच षटकांमध्ये भारताचे 3 खेळाडू 5 बाद झाले आणि ते तिन्ही झेल स्टब्सनेच टिपले होते.

हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) शेवटच्या षटकांमध्ये स्टब्सने 20 धावा केल्या, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 187 पर्यंत पोहोचू शकला.
ट्रिस्टन स्टब्सच्या या खेळीमुळेच भारताला विजयासाठी मोठे आव्हान मिळाले होते.

Comments are closed.