रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? ट्रम्प आणि पुतीन यांच्यात लवकरच चर्चा

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविराम आणि शांतता करार व्हावा याबद्दल या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा होणार आहे, अशी माहिती ट्रम्प यांचे विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी दिली आहे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील ही दुसरी चर्चा असणार आहे. युद्ध संपावे यासाठी याआधी फेब्रुवारीमध्ये दोघांत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे ठरले होते. दरम्यान, या आठवड्यात याप्रकरणी अतिशय सकारात्मक चर्चा होईल असा विश्वास स्टीव्ह विटकॉफ यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.