ट्रम्प यांचा हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफचा बॉम्ब
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर नवा टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. हिंदुस्थानातून येणाऱया वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनाने केली आहे. ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनुसार एकूण 14 देशांवर टॅरिफ लादले जाणार असून या देशांपैकी टॅरिफचा सर्वाधिक फटका बसलेला देश हिंदुस्थान आहे.
द्विपक्षीय व्यापारात हिंदुस्थानची धोरणे अमेरिकेसाठी अत्यंत जाचक आहेत, असे कारण ट्रम्प प्रशासनाने दिले आहे. हिंदुस्थानी आयातीवर अमेरिकेकडून सध्या 10 टक्के टॅरिफ आकारले जाते. आता ते 25 टक्के होईल.
- हिंदुस्थानसोबत व्यापार करार झाल्यास टॅरिफ 17 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, असे ट्रम्प सरकारने स्पष्ट केले आहे. फायद्याचा व्यापार करार करून घेण्यासाठी ट्रम्प यांनी हा डाव टाकला आहे.
Comments are closed.