ट्रम्प अमेरिकन जवानांना 1776 डॉलरचे चेक देणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रात्री देशाला संबोधित करताना एक मोठी घोषणा केली. वॉरियर डिविडेंड असे या नव्या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत अमेरिकन सरकार दहा लाख जवानांना प्रत्येकी 1,776 डॉलरचे चेक देणार आहे. सैन्यांचा सन्मान आणि योगदानासाठी ही रक्कम दिली जाणार आहे, असे ट्रम्प म्हणाले. ख्रिसमस आधीच सैन्याला ही रक्कम दिली जाईल. हा पैसा टॅरिफमधून आलेला आहे. गेल्या दहा महिन्यांत अमेरिकेने आठ युद्धे थांबवली आहेत, असा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

Comments are closed.