Israel Iran War – ‘सौदीचे राजकुमार माझी हाजी हाजी करत आहेत’; इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणविरुद्ध सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान करून जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. “सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सध्या माझी हाजी हाजी करत आहेत,” असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराणवर जमिनीवरून हल्ला  करण्यासाठी सौदीकडून दबाव आणि विनवण्या केल्या जात असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

सध्या सुरू असलेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’मुळे मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण आहे. या युद्धात सौदी अरेबियाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, इराणच्या मुद्द्यावर सौदी राजपुत्र सातत्याने त्यांच्या संपर्कात असून ते ट्रम्प यांची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ट्रम्प यांच्या मते, इराणला पूर्णपणे ठेचण्यासाठी सौदीला अमेरिकेची लष्करी साथ हवी आहे आणि त्यासाठीच ही हाजी हाजी केली जात आहे.

ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिका इतक्या वेगाने आणि प्रभावीपणे पुनरागमन करेल, अशी अपेक्षा सौदी नेत्याला नव्हती. सौदी राजकुमारांच्या हवाल्याने ट्रम्प म्हणाले की, “हे खरोखर आश्चर्यकारक आहे. एका वर्षापूर्वी तुमची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती, पण आता तुम्ही जगातील सर्वात विकसित देश बनला आहात.” सौदी नेत्याचा पूर्वी माझ्याबद्दल चुकीचा समज होता मात्र, आता अमेरिकेची प्रगती पाहून त्यांना माझ्याशी सन्मानाने आणि चांगल्या पद्धतीने वागावे लागत आहे, असेही ट्रम्प यांनी नमूद केले.

यावेळी ट्रम्प यांनी मोहम्मद बिन सलमान यांची प्रशंसा करताना त्यांना एक ‘उल्लेखनीय योद्धा’ आणि ‘विलक्षण व्यक्ती’ असे संबोधले. सौदी अरेबियाला त्यांच्या नेतृत्वाचा अभिमान वाटला पाहिजे, असेही ते म्हणाले. इराणविरुद्धच्या युद्धात सौदी अरेबियासह कतार, यूएई, बहरीन आणि कुवेत या आखाती देशांनी अमेरिकेला खंबीर पाठिंबा दिल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन शक्तीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्यासाठी आखाती देश अमेरिकेला आवाहन करत असतानाच ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे.

Comments are closed.