अमेरिकेत मिड टर्म निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या पराभवाची शक्यता; महागाई, इराण युद्धामुळे लोकप्रियता घटली
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या मिड टर्म निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. महागाई, इराण युद्धामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता प्रचंड घटली असून त्यामुळे ट्रम्प यांच्या पक्षाचा या निवडणुकीत पराभव होण्याची दाट शक्यता अमेरिकेतील बहुतांश सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेत 3 नोव्हेंबरला मिड टर्म निवडणूक होणार आहे, मात्र त्यात ट्रम्प यांच्या पक्षासमोरील आव्हान वाढले आहे. या निवडणुकीत अमेरिकेतील संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील सदस्य निवडले जातात. सध्या दोन्ही सभागृहांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाकडे किरकोळ बहुमत आहे, मात्र इराण युद्ध आणि त्यामुळे वाढलेल्या प्रचंड महागाईमुळे अमेरिकेतील जनता ट्रम्प यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता घटली आहे. याचा प्रभाव आगामी निवडणुकीत दिसू शकतो. रिपब्लिकन पक्षाला बहुमत न मिळाल्यास ट्रम्प हे अमेरिकेच्या संसदेवरील नियंत्रण गमावतील. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये डेमोव्रॅटिक पक्षाचा अडथळा असेल.
10 पैकी 9 सर्वेक्षणांमध्ये ट्रम्प पिछाडीवर
अमेरिकेतील दहा प्रमुख सर्वेक्षणांपैकी नऊ सर्वेक्षणांमध्ये ट्रम्प यांचा पक्ष पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांची लोकप्रियता प्रचंड घटली आहे. विविध सर्वेक्षणात केवळ 30 ते 35 टक्के लोक त्यांच्या कामावर खूश आहेत. हे रेटिंग ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळापेक्षा कमी आहे. ट्रम्प यांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी दिले होते, मात्र उलट महागाई वाढली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची महागाई सुमारे 30 टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावरही अमेरिकन जनता नाराज असल्याचे सर्वेक्षणातून दिसत आहे.
Comments are closed.