थोडा वेळ मिळाल्यास आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू शकतो, डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हणाले की, इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा खुली करू शकेल. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे.

“आम्ही खूप प्रगती करत आहोत. थोडा अधिक वेळ मिळाल्यास, आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू शकतो,” असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. इराणसोबतच्या वाढत्या लष्करी तणावामुळे या जागतिक तेल पुरवठा मार्गावर निर्बंध आले असताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणच्या राजवटीवर जोरदार टीका केली. त्यांनी इराणला दहशतवादाचा नंबर १ पुरस्कर्ता असल्याचे म्हटले आहे. इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांच्या प्रादेशिक कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे ट्रम्प पुन्हा म्हणाले आहेत.

दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. जागतिक तेल वापराच्या सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गावरून होतो. या मार्गावर इराणचा प्रभाव असल्याने, अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर आणि किमतींवर मोठा परिणाम झाला आहे.

Comments are closed.