ट्रम्प यांची इराणविरुद्ध आणखी एक मोठी कारवाई, खामेनी यांच्या जवळच्या १८ व्यक्तींवर अमेरिकेने घातली बंदी

अमेरिकेने इराणविरुद्ध आणखी एक मोठी आर्थिक कारवाई केली आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकी ट्रेझरी विभागाने (US Department of the Treasury) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार इराणच्या सुप्रीम लीडर आयतोल्लाह अली हुसैनी खामेनी यांच्या जवळच्या १८ उच्चाधिकाऱ्यांवर आणि संस्थांवर नवीन प्रतिबंध लादले आहेत.
हे प्रतिबंध इराणमध्ये डिसेंबर २०२५ पासून सुरू असलेल्या देशव्यापी विरोध प्रदर्शनांना हिंसकपणे दाबण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि तेल व पेट्रोकेमिकल विक्रीतून मिळणाऱ्या अब्जावधी डॉलरच्या कमाईचा गैरवापर करून पैसे लपविणाऱ्या ‘शॅडो बँकिंग’ नेटवर्कशी संबंधित आहेत.
प्रतिबंध घालण्यात आलेल्या इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सेक्रेटरी अली लारीजानी यांचा समावेश आहे. लारीजानी हे खामेनी यांचे जवळचे सल्लागार मानले जातात आणि प्रदर्शन सुरू झाल्यानंतर हिंसेसाठी सर्वात आधी आवाहन करणाऱ्यांपैकी एक आहेत. याशिवाय इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कोर (IRGC) आणि लॉ एनफोर्समेंट फोर्सेसचे काही कमांडर आणि इतर सुरक्षा अधिकारी यांच्यावरही प्रतिबंध घालण्यात आले आहे.

Comments are closed.