ट्रम्प पुन्हा तोंडघशी पडले, कोणत्याही चर्चेस इराणचा स्पष्ट नकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेतील युद्ध अधिक तीव्र होत असताना इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या चर्चेबाबतच्या दाव्याला ठाम नकार दर्शवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे सांगितले की, इराण युद्ध थांबवण्यासाठी करार करण्यास तयार आहे. मात्र त्यांनी असेही म्हटले की, अमेरिका अजून त्या करारासाठी तयार नाही कारण अटी योग्य नाहीत. इराणने हा दावा फेटाळून लावत सांगितले की, इराणने अमेरिकेकडे कोणत्याही प्रकारच्या चर्चेस सुरुवात केली नाही. सध्याच्या घडीला इराण फक्त स्वतःच्या लोकांचे संरक्षण करत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री यांनी असेही म्हटले की, हाॅर्मुझ हा समुद्री मार्ग खुला आहे, पण आमच्या शत्रूंना बंद आहे.

दरम्यान युद्धाचा प्रभाव संपूर्ण आखाती प्रदेशात दिसत आहे. या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या हाॅर्मुझवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचल्या आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण आणि त्याचे सहयोगी गटही हल्ले करत असल्याने संघर्ष लवकर थांबण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनी मार्गातून होणारी टँकर जहाज वाहतूक बंद केल्यामुळे हिंदुस्थान, युरोपसह जगभरातील अनेक देशांमध्ये इंधनटंचाई निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल केंद्रावर हल्ला करण्याची धमकी अमेरिकेने दिली होती. खर्ग बेटावर 90 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल जगभरात निर्यात होते.

Comments are closed.