Iran War – इराणने बिनशर्त शरण यावे, त्यातच त्यांचे भले; ट्रम्प यांची पुन्हा धमकी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. इराणसोबत कोणत्याही चर्चेची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. इराणला आता केवळ शरण यावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, यातच त्यांची आणि जगाची भलाई असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

“अमेरिकेची शस्त्रास्त्रे ही जगातील सर्वात धोकादायक शस्त्रास्त्रे आहेत. इराणने कोणताही पर्याय न ठेवता बिनशर्त शरण यावे. शरणागतीशिवाय त्यांच्याशी कोणताही करार किंवा तडजोड केली जाणार नाही”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या या विधानामुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ट्रम्प यांनी केवळ इराणला शरण येण्याचे आवाहन केले नाही तर, तिथल्या सत्तापालटाचेही संकेत दिले आहेत. “इराणने एकदा शरणागती पत्करली की, त्यानंतर आम्ही तिथे अशा एका नेत्याची निवड करू जो इराणसाठी अधिक चांगला असेल आणि जो जगाला स्वीकार्य असेल”, असे ट्रम्प म्हणाले.

युद्धाच्या धमकीसोबतच ट्रम्प यांनी इराणला भविष्यातील विकासाचे गाजरही दाखवले आहे. “इराणला विनाशाच्या उंबरठ्यावरून परत आणण्यासाठी अमेरिका आणि त्याचे मित्र देश सर्व आवश्यक पावले उचलतील. आम्ही इराणला आर्थिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक मोठा, चांगला आणि शक्तिशाली देश बनवू,” असे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे.

Comments are closed.