लॉस एंजेलिसमध्ये राडा, पोलिसांची छीथू! ट्रम्प यांचा आंदोलकांना इशारा

अमेरिकेमध्ये आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. त्यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात नागिरक रस्त्यावर उतरले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये निदर्शकांनी ट्रम्प यांच्याविरोधात आंदोलन केले. जनतेने थेट रस्त्यावर उतरत राडा केल्याने अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे. इमिग्रेशन विभागकडून सुरू असलेल्या छाप्यांच्या विरोधात शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या निदर्शने आता हिंसक होत आहेत.

अवैध स्थलांतरितांवरील कारवाईविरोधात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. रविवारी सकाळी निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि फटाके फेकले. तसेच काही निदर्शक पोलिसांवरच थुंकल्याने पोलिसांची सर्वत्र छीःथू होत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी निदर्शकांना केवळ कडक इशारा देत 2000 नॅशनल गार्ड सैनिकही तैनात केले आहेत. तसेच निदर्शकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ट्रम्प यांनी निदर्शकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आता निदर्शकांनी खालच्या स्तारवर उतरत पोलिसांवर थुंकण्याचा प्रकार सुरू केला आहे. निदर्शक पोलीसांजवळ जातात आणि त्यांच्या तोंडावर थुंकतात. यापुढे असे झाले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोणीही सुरक्षा दलांच्या प्रतिष्ठेशी छेडछाड करू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) ने लॉस एंजेलिसवर छापा टाकला तेव्हा निदर्शने सुरू झाली. निदर्शकांनी मारियाची प्लाझा ते डाउनटाउन एलएमधील फेडरल डिटेन्शन सेंटरपर्यंत मोर्चा काढला आणि आयसीई एलएमधून बाहेर पडा अशा घोषणा दिल्या. जमावारवर नियंत्रण मिळवण्यासाठी नॅशनल गार्डच्या सैनिकांनी अश्रुधुराचा आणि मिरपूडच्या गोळ्यांचा वापर केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनीही इशारा दिला की जर हिंसाचार थांबला नाही तर सैनिकांनाही बोलावले जाऊ शकते.

Comments are closed.