फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये इराणचे अमेरिकेत स्वागतच करू- ट्रम्प
फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत तोंडावर येऊन ठेपलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या तयारीचा आढावा घेतला. या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी इराणच्या संघाचे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत स्वागत केले जाईल, असे स्पष्ट केल्याचे इन्फेंटिनो यांनी सांगितले.
11 जून ते 19 जुलैदरम्यान अमेरिका, मेक्सिको आणि पॅनडा येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. इराण संघाला या स्पर्धेत अमेरिकेत तीन सामने खेळायचे आहेत. मात्र, सध्या वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सहभागाबाबत काही शंका व्यक्त केली जात होती.
इराणचा संघ ‘ग्रुप जी’मध्ये असून त्यांच्यासोबत बेल्जियम, इजिप्त, आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. इराण 15 जून रोजी सिएटल येथे न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळून वर्ल्ड कपच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पुढील सामने लॉस एंजेलिस आणि अटलांटा येथे होणार आहेत.
Comments are closed.