ट्रम्प यांचा रशियावर डबल ऍटॅक; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर डबल ऍटॅक करीत दोन महत्त्वाच्या तेल कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. रोसनेफ्ट आणि लुकोइल अशी या कंपन्यांची नावे असून ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून हिंदुस्थानवर काय परिणाम होणार याकडे उद्योग विश्वाचे लक्ष लागले आहे.
रशियाच्या तेल आणि वायू उद्योगातून येणारा कर हा मॉस्कोच्या एकूण अर्थसंकल्पाच्या एक चतुर्थांश आहे. त्यामुळे रशियाच्या तेल क्षेत्रावरही याचा परिणाम होणार आहे. चीन आणि भारत रशियाच्या तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. 2024 मध्ये चीनने रशियाकडून 100 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कच्चे तेल विकत घेतले होते. तर हिंदुस्थानने मागील नऊ महिन्यांमध्ये दररोज सरासरी 17 लाख बॅरल तेल आयात केले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थान रशियाचा तेल खरेदीमधील प्रमुख देश बनला आहे.
कोणत्याही दबाकाला बळी पडणार नाही – पुतीन
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष मिटकण्यासाठी ट्रम्प यांनी रशियाच्या कंपन्यांकर निर्बंध घातल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी ट्रम्प यांना सडेतोड प्रत्युत्तर देताना, रशिया कोणत्याही दबाकाला बळी पडणार नाही, असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या भूमिकेचा त्यांनी निषेधही केला आहे. तसेच टॉमहॉक क्षेपणास्त्राकरूनही पुतीन यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. यामुळे रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबकण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे.

Comments are closed.