Monsoon Trending Footwear: पावसाळ्यात ट्राय करा हे ट्रेंडिंग फुटवेअर

पावसाळ्यात महिलांना अनेकदा आऊटफिट निवडताना अडचणी येतात. कारण फिकट रंगाचे किंवा जास्त लॉन्ग कपडे घालणे चॅलेंजिंग असते. आऊटफिटसह चप्पल किंवा सॅंडल निवडणे देखील कठीण होते. मात्र पावसाळ्यात काही ट्रेंडिंग फुटवेअरचे पर्याय तुम्ही ट्राय करू शकता. यामुळे क्लासी लूक मिळेल. हे फुटवेअर कोणते ते जाणून घेऊया..

कोल्हापुरी चप्पल

मराठमोळी कोल्हापुरी चप्पल ही पावसाळ्यात घालण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कोल्हापुरी चप्पल ही ट्रेडिशनल आऊटफिटवर शोभून दिसते. याचे त्वचेलाही फायदे होतात. तसेच ही चप्पल एकदम कम्फर्टेबल असते.

लेदर शूज

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचलेले असते. तसेच चिखलही असतो. यामुळे योग्य फुटवेअर घालणे गरजेचे आहे. अनेकदा घसरण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे लेदरच्या शूज किंवा सॅंडल घालावी. यामध्ये अनेक प्रकार देखील असतात. ते वेस्टर्न आऊटफिटवर देखील शोभून दिसतात.

वॉटरप्रूफ बूट

जर तुम्ही पावसात बाहेर पडणार असाल तर वॉटरप्रूफ बूट तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतील. हे तुम्हाला घसरण्यापासून तसेच चिखलापासून वाचवू शकतात. तसेच हे वेस्टर्न आऊटफिटवर सूट होतात. प्रवासाला जाताना तुम्ही वॉटरप्रूफ बूट घातल्यास फायदा होईल.

फ्लिप फ्लॉप

पावसात तुम्ही फ्लिप फ्लॉप फूटवेअर घालावेत. हे खूप स्टायलिश दिसतात. ऑफिससाठी देखील हे उत्तम पर्याय आहेत. हे हलके असतात त्यामुळे सहज कॅरी करता येतात.

Comments are closed.