रशियाला त्सुनामीचा इशारा, प्रशांत महासागरात एका तासात भूकंपाचे 5 धक्के

रशियाच्या पूर्वेकडील प्रशांत महासागर आज पाच शक्तिशाली भूकंपांनी ढवळून निघाला. रिश्टर स्केलवर 6 ते 7 तीव्रतेचे हे भूकंप अवघ्या एका तासात झाले. यात कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही, मात्र या भूकंपानंतर रशिया व हवाई बेटाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रशियाच्या पूर्वेकडील कामचत्का किनाऱ्यापासून 150 किमी अंतरावर झालेले हे भूकंप समुद्रात 10 किमी खोलवर झाले, अशी माहिती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिली.

Comments are closed.