TTV दिनकरन यांनी 'TVK' विरोधात तक्रार दाखल केली आहे.
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूतील राजकीय पक्ष ‘एएमएमके’ने गिंडी पोलीस ठाण्यात टीव्हीकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. टीव्हीकेने आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी पाठिंब्याच्या बनावट पत्राचा वापर केल्याचा आरोप या तक्रारीत ‘एएमएमके’ने केला आहे. ही तक्रार एएमएमकेचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांनी दाखल केली आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. राज्यातील एएमएमकेचे एकमेव आमदार मन्नारगुडी मतदारसंघाचे एस. कामराज आहेत. तथापि, टीव्हीकेने एएमएमकेचे आरोप फेटाळून लावत आमदार कामराज स्वत: समर्थन पत्रावर स्वाक्षरी करत असल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला.
Comments are closed.