तुकाराम फायटर्स ठरला जीपीएलचा विजेता

तुकाराम फायटर्सने गतवर्षी हुकलेल्या जेतेपदाची भरपाई करताना मिर्ची ग्रुपच्या गणेशगल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत (जीपीएल) भाविक इलेव्हनचा चुरशीच्या लढतीत पराभव केला आणि जेतेपदावर आपले नाव कोरले. सर्वेश सावंतने ‘मालिकावीर’ पुरस्कारावर कब्जा केला, तर आदित्य केरकरने उत्कृष्ट फलंदाजाचा मान मिळवला. विशाल माडखोलकरने गोलंदाजाचा तर अमित गुप्ताने क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार पटकावला.
गेले चार दिवस सुरू असलेल्या मिर्ची ग्रुपच्या क्रीडा महोत्सवात पुरुष, महिला आणि ज्युनियर्सच्या जीपीएलचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषांच्या जीपीएलमध्ये तुकाराम फायटर्सने भाविक इलेव्हनचे 25 धावांचे आव्हान 2.2 षटकांत गाठले. ज्युनियर्सच्या जीपीएलमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारात रॉयल चॅलेंजर्स गणेशगल्लीने गणेशगल्ली सुपर किंग्जचा अवघ्या एका धावेने पराभव केला. रॉयल चॅलेंजर्सने 43 धावांचे आव्हान दिले होते, पण सुपर किंग्ज 41 धावाच करू शकली. महिलांच्या जीपीएलमध्ये दिल्ली पॅपिटल्स क्वीन्सने मुंबई इंडियन्स क्वीन्सचा 22 धावांनी पराभव करत जेतेपद पटकावले. या धमाकेदार महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ शिवडी विधानसभा संघटक आणि शिवसेना सचिव सुधीर साळवी, मिर्ची ग्रुपचे अध्यक्ष आणि शाखाप्रमुख किरण तावडे, इंडियन ऑईलचे वरिष्ठ अधिकारी विजय तावडे, ग्रुपचे सचिव कुणाल सावंत, खजिनदार प्रथमेश कदम आणि शशांक पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
Comments are closed.