पतीने कुदळ, फावडा घेऊन बांधला रस्ता; चंद्रपुरात रस्त्याअभावी गर्भवती पत्नीचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रेयसीसाठी डोंगर फोडून रस्ता तयार करणाऱ्या ‘मांझी’ची आठवण करून देणारी घटना चंद्रपुरात घडली. चंद्रपूर जिह्यातील घोडनकप्पी गावात रस्त्याअभावी गर्भवती पत्नीचा मृत्यू झाल्याने व्यथित झालेल्या तुळशीराम गेडाम यांनी स्वतः कुदळ, फावडे घेऊन रस्ता बनवला.

तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर दुर्गम भागात हे गाव आहे. रस्त्याअभावी गर्भवती पत्नीचा मृत्यू झाल्याने व्यथित झालेल्या तुळशीराम यांनी स्वतः कुदळ, फावडे घेऊन रस्ता बनवण्याचा निर्धार केला. त्यांच्या या भूमिकेला ग्रामस्थांनी साथ देत श्रमदानातून 1.5 किलोमीटरचा रस्ता तयार केला.

रस्त्यासाठी 20 कुटुंबे एकवटली

जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून सर्वांनी श्रमदानास सुरुवात केली. बघता बघता दीड किलोमीटरचा रस्ता तयार झाला आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी गावातील सुमारे 20 कुटुंबे एकवटली होती. हे सर्व लोक झोळी करून रुग्णांना नेत होते. आता रस्ता झाल्याने रुग्णवाहिका नसली तरी बैलगाडी किंवा इतर वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेता येणार आहे.

Comments are closed.