तुर्की सैनिक भारताविरूद्ध ड्रोन चालवत होते

पाकिस्तान-तुर्किये साटंलोट्यांप्रकरणी नवा खुलासा : तुर्कियेचे दोन ड्रोन ऑपरेटर ठार

भारतासोबतच्या संघर्षादरम्यान पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात तुर्कियेकडून पुरविण्यात आलेल्या ड्रोन्सचा वापर केला आहे. आता यासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. यानुसार पाकिस्तानने वेगवेगळ्या हल्ल्यांकरता एकूण 350 हून अधिक तुर्कियेच्या ड्रोन्सचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानात असलेले तुर्कियेचे सैनिक भारताच्या विरोधातील ड्रोन हल्ल्यात सामील होते असेही समजते.

ऑपरेशन सिंदूनंतर भारतावर ड्रोन हल्ले करण्यासाठी तुर्कियेच्या सल्लागारांनी पाकिस्तानच्या सैन्याला मदत केली होती. भारताच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत तुर्कियेचे दोन ड्रोन ऑपरेटरही मारले गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पाकिस्तानने कथित स्वरुपात भारताच्या विरोधात टीबी2 ड्रोन्स आणि वायआयएचए ड्रोन्सचा वापर केला. या ड्रोन्सचा वापर लक्ष्यनिश्चिती आणि आत्मघाती हल्ले करत शत्रूला नुकसान पोहोचविण्यासाठी केला जातो.

तुर्कियेकडून सर्वप्रकारची पाकला मदत

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यात सहभागी दोन दहशतवादी पाकिस्तानी असल्याने भारताने प्रत्युत्तरादाखल अनेक पावले उचलली, ज्यात 1960 चा सिंधू जल करार रद्द करणे देखील सामील होते. 7 मे रोजी रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अ•dयांना लक्ष्य  करत एअरस्ट्राइक केला, ज्यात कमीतकमी 100 दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर पाकिस्तानने भारताचे सैन्यतळ आणि नागरी वस्तींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. हा संघर्ष 4 दिवसांपर्यंत चालला, ज्यात तुर्कियेने उघडपणे पाकिस्तानला साथ दिली. मागील आठड्यात गुरुवारी रात्री पाकिस्तानने ज्या ड्रोन्सद्वारे भारताच्या उत्तम आणि पश्चिम सीमेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अवशेषांच्या प्रारंभिक तपासणीतून ते तुर्कियेकडून निर्मित सोंगल ड्रोन सिस्टीमचे असल्याचे समोर आल्याचे भारत सरकारने सांगितले होते.

तुर्कियेच्या एसिसगार्ड कंपनीच्या सोंगर ड्रोन्सचा पाकिस्तानने भारताच्या विरोधात वापर केला. भारत-पाकिस्तान संघर्ष सुरू होण्यापूर्वी तुर्कियेच्या नौदलाची एक युद्धनौका टीसीसी बुकुकाडा कराची बंदरावर पोहोचली होती. त्यापूर्वी तुर्कियेच्या सी-130 विमानाने कराचीत लँड केले होते. या विमानातून शस्त्रास्त्रs आल्याचा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला होता. तर तुर्कियेच्या संरक्षण मंत्रालयाने हा दावा फेटाळत विमान इंधन भरण्यासाठी कराची येथे उतरले असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

कुठल्याही स्थितीत पाकिस्तानला साथ : तुर्किये

तुर्कियेचे अध्यक्ष रेचेप तैयप एर्दोगान यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे जाहीरपणे समर्थन केले आहे. तुर्किये चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात पाकिस्तानसोबत उभा राहणार असल्याचे एर्दोगान यांनी म्हटले आहे. एर्दोगान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पाकिस्तानसोबतचे संबंध  अतूट असल्याचा दावाही केला.

Comments are closed.