हिंदुस्थानकडून बॉयकॉट, तुर्कीये देशाला 750 कोटी रुपयांचा फटका

ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्किये देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यानंतर हिंदुस्थानात तुर्कीये देशावर बहिरष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बहिष्कारामुळे तुर्किये देशाला 750कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
हिंदुस्थानी नागरिक तुर्कीये देशात फिरण्यासाठी आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी जातात. आता हिंदुस्थानींनी तुर्किये देशावर बहिष्कार घातला आहे. तुर्किये देशाची पर्यटनाची आणि अर्थव्यवस्था ही 750 कोटी रुपयांची आहे.
हिंदुस्थानी कुटुंबात डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुर्किये देश लोकप्रिय होता. तुर्किये देशात हिंदुस्थानी लग्नांमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. आता तुर्कियेने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने हिंदुस्थानी कुटुंबांनी तुर्कियेवर बहिष्कार घातला आहे. तुर्कियेऐवजी इटली, थायलंड, दुबई आणि मॉरिशसला जाणे पसंत केले आहे.
हिंदुस्थान पाकिस्तानच्या तणावात तुर्कीयेच्या 2 हजारपेक्षा जास्त बुकिंग रद्द झाल्या आहेत. तसेच 2025 साली होणाऱ्या 50 पैकी 30 लग्न दुसरीकडे होण्याची शक्यता आहे. यामुळे तुर्कियेला 750 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या बहिष्कारामुळे स्थानिक फुलविक्रेते, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल्स आणि वाहतूक सेवा पुरवणाऱ्यांना थेट फटका बसणार आहे.
Comments are closed.