Tushar bhosale reply chhagan bhujbal himalaya sadhu sant statement


मुंबई : हिमालयात साधू-संत खूप आहेत. त्यांचे काय करायचे? त्यांचा काही उपयोग आहे का आपल्याला हे मला सांगा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. भुजबळ यांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. भुजबळांच्या वक्तव्याचा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे नेते, तुषार भोसले यांनी समाचार घेतला आहे.

काही साधू संत हे समाजाच्या कल्याणासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या व साधना करतात. ते छगन भुजबळांसारखे समाजाच्या जीवावर स्वतःचे घर भरत नाहीत, अशी टीका तुषार भोसले यांनी केली आहे. यावर भुजबळ काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

हेही वाचा : अजितदादांकडून ‘DPDC’ बैठकीला निमंत्रण नव्हते? शिंदेंच्या आमदारांना डावलले जातंय? भरत गोगावले म्हणाले…

भुजबळ काय म्हणालेले?

छगन भुजबळ यांनी नुकताच नाशिक येथील कृषी महोत्सवात बोलताना आपल्याला हिमालयातील साधू-संतांचा काय उपयोग? असा सवाल उपस्थित केला होता. “अन्न-धान्य, पाणी आदी सर्व गोष्टींमध्ये प्रदूषण वाढले आहे. मुंबईमध्ये दूध येते, पण त्याची भीती वाटते. किडन्या खराब होणार नाही, तर काय होणार? हे पाप नाही का? देवाची भक्ती शुद्ध अंतकरणाने केली पाहिजे. तशीच भक्तीपूर्वक शेती केली पाहिजे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान हे आपल्याला सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतीला विज्ञानाची जोड कशी देता येईल? हे पाहिले पाहिजे. आपण यासंबंधी अनेक प्रयोग कसे करता येतील हे शिकले पाहिजे,” असं भुजबळ यांनी म्हटले होते.

“आपल्या देशात सगळी विद्या आपल्या पुरतीच ठेवण्यात आली. पुढच्यांना शिकवली नाही. त्यामुळे ऱ्हास झाला. हिमालयात साधू-संत खूप आहेत. त्यांचे काय करायचे? त्यांचा काही उपयोग आहे का आपल्याला हे मला सांगा?” असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला होता.

भुजबळांच्या विधानावर बोलताना तुषार भोसले यांनी म्हटले, “काही साधू-संत समाजात राहून कार्य करतात. तर काही साधू-संत हे समाजाच्या कल्याणासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या कररतात. ते छगन भुजबळांसारखे समाजाच्या जीवावर स्वतःचे घर भरत नाहीत किंवा समाजाचा उपयोग स्वतःच्या मुलाला किंवा पुतण्याला आमदार, खासदार करण्यासाठी करत नाहीत. अहो भुजबळ, तुमच्या पक्षानेच तुम्हाला हिमालयात पाठवण्याची व्यवस्था केली आहे. त्याच्याकडे नीट बघा,” असा टोला तुषार भोसले यांनी लगावला आहे.

हेही वाचा : आधी ठाकरे अन् राऊतांकडून समाचार, आता अण्णा हजारेंचे जशास तसे प्रत्युत्तर; म्हणाले, एखादा माणूस…



Source link

Comments are closed.