ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सींच्या कंपनीत कर्मचारी कपात, स्वप्नांवर कात्री! एआयने 4 हजार लोकांची नोकरी खाल्ली

ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांची कंपनी ब्लॉक इंकने मोठय़ा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनी 4 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कर्मचारी कपात एकूण वर्कर्सची जवळपास अर्धी संख्या असणार आहे.

डोर्सी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या निर्णयाची माहिती दिली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टूल्सने कंपनी बनवणे आणि चालवण्यासाठी आपल्या कामाच्या पद्धतीत बदल केले आहेत. कर्मचारी कपातीनंतर कंपनी आता एआयच्या मदतीने छोटी टीम कुशल आणि चांगल्या पद्धतीने काम करू शकते.

डोर्सीने म्हटले की, कंपनी बिझनेसमध्ये मजबूत स्थितीत आहे. ग्रॉस प्रॉफिट वाढत आहे. ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. नफाही चांगला कमावला जात आहे, परंतु एआय आधारित इंटेलिजेन्स टूल्समुळे संघटनात्मक बदल करणे आवश्यक झाले आहे. कंपनीच्या इतिहासात सर्वात कठीण निर्णय घेणे भाग पडले आहे. कंपनीने हे पाऊल उचलण्यामागे कोणतेही आर्थिक संकट नाहीय. उलट भविष्यातील कार्यशैलीला ध्यानात ठेऊन हा निर्णय घेतला आहे.

ब्लॉक कंपनीची सुरुवात 2021 मध्ये स्क्वेअर नावाने सुरू करण्यात आली होती. 2021 मध्ये याचे नाव बदलून ब्लॉक करण्यात आले.

महिन्यांचा अति पगार

कर्मचारी कपातीमध्ये ज्यांची नोकरी जाणार आहे, त्या कर्मचाऱ्यांना 20 आठवडय़ांचा पगार दिला जाणार आहे. याशिवाय कॉ.पनीमध्ये जेवढे वर्ष काम केले आहे, त्या प्रत्येक वर्षासाठी एक आठवडय़ाचा अति पगार दिला जाईल.

कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत आरोग्य केअर सुविधा, पंपनीकडून देण्यात आलेले डिव्हाईस आणिएक हजार डॉलरची अति मदत निधी दिला जाईल.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानप्रेमी कॉ.पनीचा वाढता लक्ष केंद्रित दर्शवला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, रीस्ट्रक्चरिंगवर ४५० ते ५०० दशलक्ष डॉलर खर्च येईल. ३१ डिसेंबरच्या तिमाहीत कॉ.पॅनिन ६५ सेंट प्रति शेअरचे अॅडजस्टेड नफा नोंदवले आहे.

Comments are closed.