महायुतीतील पक्षांमध्ये शून्य समन्वय, ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी माणसे नेमण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस-मिंधेंमध्ये चढाओढ – अंबादास दानवे

महायुतीतील पक्षांमध्ये समन्वय शून्य आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी माणसे नेमण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्ली वाऱ्या करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागांची ही चढाओढ सुरु आहे. तीन लोक एकमेकांत समन्वय साधू शकत नसतील तर 11 कोटी जनतेचे कोणते कल्याण हे करतील? असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.
दरम्यान, बेस्ट महाव्यवस्थापक पदासाठी अतिरिक्त कार्यभार मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दोन अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने गोंधळ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याकडून आशिष शर्मा यांची त्याच पदावर नेमणूक केली. एकाच पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश आणि दोघांकडे अतिरिक्त कार्यभाराचा आदेश देण्यात आल्याने या दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
महायुतीतील पक्षांमध्ये समन्वय शून्य आहे याचे हे साधे उदाहरण. ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी माणसे नेमण्याची मुख्यमंत्री आणि दिल्ली वाऱ्या करणारे उपमुख्यमंत्री यांच्या विभागांची ही चढाओढ. तीन लोक एकमेकांत समन्वय साधू शकत नसतील तर ११ कोटी जनतेचे कोणते कल्याण हे करतील? @Dev_fadnavis… pic.twitter.com/s7yhmk58jj
– अंबाविस डेव्ह (@आयम्बोएपडेव्ह) 6 ऑगस्ट, 2025
Comments are closed.